(पिंपळगाव बसवंत) कृष्णा गायकवाड
जोरणपाडा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) प्रकल्पासाठी गावातील शेतकरी बांधवांकडून अपेक्षेपेक्षा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कृषी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उत्साहात पूर्ण केली.
पोखरा प्रकल्पाच्या माध्यमातून महाविस्तार अॅप डाउनलोड, फार्म आयडी निर्माण, कागदपत्रांची पूर्तता यासंबंधीचे सर्व मार्गदर्शन कृषी विभागाच्या पुढाकारातून देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना आपले अर्ज सुलभरीत्या नोंदविता आले.
ही संपूर्ण प्रक्रिया कृषी सहायक अधिकारी मा. सुधाकर शिलावटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. शिलावटे सरांनी शेतकऱ्यांना उपलब्ध योजनांची सविस्तर माहिती देत, निर्धारित वेळेत अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांनी दाखवलेल्या उत्साहामुळे कॅम्प परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. अद्याप अर्ज नोंदवू न शकलेल्या शेतकरी बांधवांनीही या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
या प्रसंगी उपस्थित:
कृषी सहायक अधिकारी:
मा. सुधाकर शिलावटे
शेतकरी बांधव:
नामदेव गायकवाड
गणेश गवळी
पडित गायकवाड
नामदेव गावित
कमळाकर गवळी
सुलोचना गवळी
रामजी गावंढे
विलास गावंढे
निवृत्ती गायकवाड
निवृत्ती महाले सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


























