श्री माणकेश्वर वाचनालयात स्व.पंडित नेहरू यांना अभिवादन

 

निफाड /प्रतिनिधी

निफाडची वाचन संस्कृती जोपासणाऱ्या श्री माणकेश्वर वाचनालय येथे आज दि. 14 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस व बालदिनाच्या निमित्ताने प्रतिमेस प्रवीण तनपुरे व संचालिका सुजाता तनपुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सुजाता तनपुरे यांची निफाड तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वाचनालयाच्या वतीने उपाध्यक्ष डॉ. मेघा जंगम यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकरराव शेलार,उपाध्यक्ष डॉ. मेघा जंगम, चिटणीस बाळासाहेब कापसे, सहचिटणीस राहुल दवते, हिशोब तपासणीस दत्ताकाका उगावकर, संचालक राजेंद्र खालकर, तनवीर राजे, सुहास सुरळीकर, बाळासाहेब कर्डिले यांसह प्रभारी ग्रंथपाल नितीन बनसोडे, अनिता इस्ते, नंदकुमार पुंड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *