शनिशिंगणापूर ऑनलाइन पूजा एपमध्ये आर्थिक घोटाळा: फसवणूक झालेला एकही भक्त पुढे येईना; तपास यंत्रणा अडचणीत

नाशिक / अहमदनगर । शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेव संस्थानच्या नावाने चालवण्यात येणार्‍या एका ऑनलाइन पूजा बुकिंग ?पच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक फसवणुकीचा आरोप समोर आला आहे. तथाकथित अधिकृत वाटणार्‍या या ?पद्वारे हजारो भक्तांनी पूजा व अभिषेकासाठी पैसे भरले. मात्र, न पूजा झाली, ना रसीद मिळाली. अनेकांच्या खात्यातून पैसे वळते झाले. तरीदेखील, या प्रकरणी फसवणूक झालेला एकही शनिभक्त तपास यंत्रणेसमोर खुलेपणाने पुढे येत नसल्याने पोलीस तपासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
‘ऑनलाइन भक्ती’, पण भरकटलेली आस्था
कोरोना काळात सुरू झालेल्या ‘ऑनलाइन पूजांच्या’ ट्रेंडचा गैरफायदा घेत खाजगी व्यक्तींनी शनिशिंगणापूर संस्थानच्या नावाने एप तयार करून, डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. वेबसाइट व ?पवर पूजा, अभिषेक, शनि जयंतीसारख्या विशेष कार्यक्रमांसाठी बुकिंगचे पर्याय देण्यात आले होते. हजारो लोकांनी श्रद्धेने पैसे भरले. पण प्रत्यक्षात या पूजांचा काहीच मागमूस नव्हता.
‘भक्त’ पुढे येत नसल्याने गुन्हा सिद्ध करणं अवघड
सुरुवातीला काही तक्रारी आल्या, मात्र कोणत्याही शनि भक्ताने थेट लेखी किंवा ऑनलाइन तक्रार करण्यास पुढाकार घेतलेला नाही. अनेक जण ‘देवाच्या कामात वाद नको,’ या मानसिकतेमुळे गप्प बसले आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले स्पष्ट पुरावे, साक्षीदार आणि आर्थिक व्यवहारांची निश्चित माहिती तपास यंत्रणेला मिळत नाही.
संस्थेचा संबंध नाही, पण नावाचा वापर फसवणुकीसाठी
श्री शनिशिंगणापूर संस्थानने स्पष्ट केले आहे की, या ऑनलाइन ?पचा किंवा बुकिंग पोर्टलचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. संस्था अधिकृत पूजेसाठी केवळ मंदिर परिसरात प्रत्यक्ष उपस्थित राहणार्‍या भक्तांना सेवा देते, ऑनलाइन सुविधा सध्या सुरू नाहीत.
‘फसवणूक करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई होणार’ — पोलिस
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणाले की, ‘हा गुन्हा ‘सायबर फसवणुकीचा’ उत्तम उदाहरण आहे. धर्म, श्रद्धा आणि डिजिटल व्यवहार यांचे मिश्रण करून विश्वास ठेवणार्‍या लोकांची आर्थिक पिळवणूक केली गेली आहे. फसवणूक झालेल्यांनी समोर यावे, तरच आम्ही पावले उचलू शकतो.’
तपासासाठी मदतीचे आवाहन
या संदर्भात पोलीस आणि सायबर विभाग नागरिकांना आवाहन करत आहेत की, ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
भविष्यातील धोका टाळण्यासाठी काय कराल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *