णमोकार तीर्थ येथे चातुर्मास उत्साहात कलश स्थापना संपन्न

उमराने (विनोद पाटणी) । मालसाने (चांदवड) येथे राष्ट्रसंतआचार्य श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने निर्मित भव्य णमोकार तीर्थ येथे आचार्यश्रींचा ४५ वा चातुर्मास कलश स्थापना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमासाठी देश-विदेशातून आलेल्या भक्तांनी सवाद्य गुरुभवन येथून भव्य मिरवणूक काढली ‘णमोकार तीर्थ की जय,आचार्य श्री देवनंदिजी महाराज की जय, समस्त मुनी संघ की जय, आदी जय जयकारा च्या’ घोषणा दिल्या डोक्यावर सुंदर व सजवलेले कलश घेतलेल्या भगिनीं अग्रभागी होत्या .मुख्य मंडपात पोहोचल्यावर आचार्य श्रींचे देवनंदिजी महाराज, कुमुदनंदीजी महाराज कर्मविजय नंदजी महाराज यांचे पदप्रक्षालन व अष्टदव्याने पूजन करण्याचा मान मनीष जैन, ऋषभ जैन परिवार दिल्ली यांना मिळाला, कुमारी निरल व नेहल जैन इंदूर यांनी सुंदर गुरु भजन व नृत्य सादर केले , सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गंणधराचार्य कुंथुसागरजी महाराज फोटो अनावरण व दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्रथम चातुरमास कलश स्थापन करण्याचा बहुमान प्रदीप गंगवाल बेंगलोर यांना मिळाला, सलग तीन दिवस आहार दान व भक्तांना गौतमप्रसादी दान दातार ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीर गंगवाल हर्षा गंगवाल,चातुर्मास समितीचे संघपती तीर्थ रक्षा कमिटी राज्याध्यक्ष मिहीर गांधी,माजी राज्याध्यक्ष अनिल जमगे दिनेश शेठी ललित पाटणी,संजय कासलीवाल, भूषण कासलीवाल यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या प्रवचनात आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांनी शिक्षक धर्मगुरू च्या पहिले आई-वडीलच सर्वात प्रथम आपले मुख्य गुरु आहेत त्यांनी कष्टातून तुम्हाला घडवले, शिक्षण दिले,संस्कार दिले,जीवन जगण्याचा चांगला मार्ग दाखवला त्या आई-वडिलांची सेवा करा त्यांची संपत्ती तुम्हाला आपोआपच मिळेल असेही सांगितले याप्रसंगी आचार्य श्री कुमुदनंदीजी श्री कर्मविजयनंदिजी, पावनकीर्तीजी आर्षकीर्तीजी यांचे प्रवचने झालीत, आंतरराष्ट्रीय पंचकल्याण कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पेंढारी नमोकार तीर्थ चे अध्यक्ष नीलम अजमेरा बालब्रम्हचारी वैशाली दिदि मांगीतुंगी जी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला, ग्लोबल महासभेचे राष्ट्रीय महामंत्री पारस लोहाडे यांची गुरूंच्या जीवनावर पंच कल्याणक महोत्सव नियोजन यावर भाषणे झालीत, नाशिकचे कर सल्लागार अशोक लोहाडे, ज्येष्ठ श्राविका हिराबाई गंगवाल यांनी जैनेश्वरी दीक्षा घेण्याचा संकल्प घेत गुरुचरणी श्रीफळ चढवला,णमोकार तीर्थ कळस स्थापना करण्याचा बहुमान मिळालेल्या स्वर्णमाला जैन, निलेश जैन,जितेंद्र सिंघही,पवन घुवारा,बाळचंद जैन,निलेश पाटणी, अरविंद गरिबे,चंद्रकांत गडकर, नीलम गंगवाल, अर्चना जैन,जयमाला जैन, मीना रमेश काला,प्रीती संजय पहाडे यांच्या हस्ते चातुर्मास कलश स्थापना करण्यात आली, टीना जैन यांनी मधुर आवाजात भजन गायन केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले संतोष काला यांनी आभार मानले, नांदेड पुणे सोलापूर संभाजीनगर नाशिक ओझर मालेगाव चांदवड मनमाड नांदगाव लासलगाव उमराणा येथील नमोकार भक्त परिवाराच्या वतीने आचार्य श्रींना शास्त्र प्रदान करण्यात आले माताजींना महिला भक्ता परिवारातर्फे वस्त्र प्रदान करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *