मालेगाव (विनोद पाटणी) मधुर व्याख्यानी उपाध्याय प्रवर पूज्य डॉ. श्री. गौतम मुनीजी म. सा. व आगमज्ञाता पूज्य वैभवमुनीजी म. सा.यांचा चातुर्मास मालेगाव येथे होणार असून आनंद दरबार , मधुबन कॉलनी, कलेक्टर पट्टा येथे मंगल प्रवेश झाला.
मंगल प्रवेश यात्रा ओस्तवाल जैन स्थानक येथून प्रारंभ झाली पांढरेशुभ्र सामायिक वेशभूषेमध्ये असलेले १०८ पेक्षा जास्त ‘जैन बांधव’ भगवान महावीर की जय,
आनंद ऋषिजी म सा की जय,
वंदे वीरम ‘ आदी जय जय कारा च्या घोषणा देत आग्रा रोड, मोसमपुल, देव मोटर्स मार्गे आनंद दरबार येथे पोहोचली कार्यक्रमाचा शुभारंभ
सुशील बहु मंडळ यांच्या मंगलाचरणाने झाला आनंद पाठ शाळेच्या वतीने लुक लर्न हे सुंदर धार्मिक नाटक झाले बारा बलुतेदार मंडळाचे अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांचे भाषण झाले व नवीन वास्तु पुण्यशाली बांधकामा साठी ५१ हजार रुपये देणगी जाहीर करतो असे सांगितले मुनीश्रींची प्रवचने झालीत सर्व संघाचे जेष्ठ सदस्य हरकचंद कांकरिया, म्हसरूळ नाशिक संघपती अभय सुराणा, संघपती राजेंद्र ओस्तवाल,आदी मान्यवरांची भाषणे झाली
याप्रसंगी बंडूकाका बच्छाव,मदन बापू गायकवाड,अजय मंडवेवाला,सतीश दुगड आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास हैदराबाद बेंगलोर पुणे व नाशिक धुळे जळगाव जिल्ह्यातील जैन बांधवमोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे मंत्री सुशील नहार यांनी केले चातुर्मास कमेटी अध्यक्ष रुपेश कांकरिया यांनी आभार मानले गौतम प्रसादीने कार्यक्रमाची सांगता झाली
उपाध्याय डॉ.गौतममुनीजीआगमज्ञाता वैभव मुनीजी यांचे मालेगावी चातुर्मास निमित्त जल्लोषात स्वागत






















