लासलगाव (आसिफ पठाण)
लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणेशमूर्ती बनविणे कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचे उदघाटन संस्थेचे मानद सचिव शांतीलाल जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यालयातील इ. 5 वी चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यालयाचे कलाशिक्षक प्रवीण कहाणे यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणेशमूर्ती बनविण्याचे मार्गदर्शन करीत प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाडू माती पासून अप्रतिम अशा गणेश मूर्ती साकारल्या. विद्यालयाचे संगीत शिक्षक सचिन आहेर यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी चव्हाणके, पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ, उपशिक्षक ज्ञानेश्वर मोहन, अनिल कुंभार्डे, सचिन मुंगसे, उपशिक्षिका माधुरी पाटील व सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर उपक्रमाचे संस्थेचे कार्याध्यक्ष जवाहरलाल ब्रम्हेचा , मानद सचिव शांतीलाल जैन , खजिनदार अजय ब्रम्हेचा, संचालक मोहनलाल बरडिया, महावीर चोपडा, अमित जैन, सुनिल आब्बड व संस्थेचे पालक प्रतिनिधी अक्षय ब्रम्हेचा यांनी विशेष कौतुक केले

























