बीड शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. विनोद जी ओस्तवाल यांच्या हस्ते व जन शिक्षण संस्थानचे उपाध्यक्षा डॉ.सत्यभामा चोले संचालक श्री गंगाधर जी देशमुख, नानाजी देशमुख विद्या मंदिर सचिव डॉ. सीमा जोशी, शालेय समिती सदस्य अनिता वझूरकर ,श्री हेमंत जीआडगावकर ,श्री दीपक जी मुळे ,श्रीमती सुनंदाताई कुलकर्णी व सर्व कार्यकर्त्यांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
नानाजी देशमुख विद्यामंदिर व गोकुळ शिशुवाटिकेच्या मुलांचे कवायत, वैयक्तिक पद्य ,सामूहिक पद्य,भाषण, पथसंचलन मान्यवरांना मानवंदना इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.
जन शिक्षण संस्थान बीडच्या वतीने दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या स्लोगन लेखन, रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच जन शिक्षण संस्थान चे सर्व प्रशिक्षक ,कार्यकर्ता बंधू भगिनी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितानी हर घर तिरंगा या सेल्फी पॉइंटवरून सेल्फी घेण्याचा आनंद घेतला.
जन भागीदारी, हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जन शिक्षण संस्थान बीड कार्यालयात विविध कार्यक्रम संपन्न .


























