नाशिक दरवर्षीप्रमाणे जैन समाजातील इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना दमा टी. बी व छाती रोगतज्ञ तसेच हास्य योग तज्ञ डॉक्टर सौ सुषमा आर .दुगड अध्यक्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्ट , अध्यक्ष यांच्यातर्फे दिला जाणारा ,स्व. पू .श्रीयशाजी महाराज ह्यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा २८ वा. पू.श्रीयशा पुरस्कार ,नाशिक 2025, पू किरण सुधाजी महाराज ,घोर तपस्वी विशाल प्रभाजी महाराज, आदि ठाणा ७ यांच्या सानिध्यात देण्यात आला.
यावर्षीचे श्रीयशा पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, इयत्ता दहावी प्रथम ,भाविक प्रदीप जैन 99 टक्के ,द्वितीय क्रमांक कुमारी मेहेक हितेश टाटिया 98%, तृतीय: निधी संतोष समदडिया 97.4 टक्के व उत्तेजनार्थ सार्थक आशिष ओसवाल , क. इशीका महावीर बोरा, कु.रचित धीरज जैन तर इयत्ता बारावीत ( सायन्स )प्रथम अंशुल अजय तातेड 98%, द्वितीय क्रमांक, हर्ष प्रमोद बाफना ,( ९३%), तृतीय क्रमांक ऋषभ प्रिया निर्मल गुजराणी हे आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. रश्मी भोसले, तसेच प्लास्टिक सर्जन डॉक्टर आनंद दुगड व आर .के. जैन स्थानक श्रीसंघाचे सचिव श्री जवरीलाल भंडारी व डॉक्टर श्री अतिश
ओस्तवाल ,श्री सुभाष लोढा यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सौ. सुषमा दुगड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर सौ.भक्ती दुगड ,कटारिया.डॉ आनंद दुगड, , सौ.स्मिता छाजेड यांनी परिश्रम घेतले.

























