*नाशिक जिल्ह्यात विकासाचा नवा टप्पा गाठणारा एक ऐतिहासिक सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष प्रसंगी शालेय शिक्षणमंत्री ना. श्री. दादाजी भुसे उपस्थित होते.*
नाशिक जिल्हा परिषदेची ही नवीन इमारत राज्यातील सर्वात मोठी, आकर्षक आणि अत्याधुनिक सुविधांनी सजलेली इमारत म्हणून विशेष ओळख मिळवत आहे. सुबक बांधकाम, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकाभिमुख रचना यामुळे सर्वसामान्यांसाठी अधिक गतिमान, पारदर्शक आणि सोयीस्कर प्रशासन उपलब्ध होणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना येथे सेवा मिळणे अधिक सुकर होणार आहे.
यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या “Roots of Change – नाशिकच्या ग्रामीण महिला उद्योजिकांच्या यशोगाथा” या प्रेरणादायी मासिकाचे प्रकाशन केले. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या मेहनतीने आणि उद्योजकतेने मिळवलेल्या यशोगाथांचा हा संग्रह असून, महिलांना नवीन दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी विकासाचा नवा अध्याय सुरू करणारा हा दिवस ठरला.
या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री श्री. गिरीष महाजन, मंत्री ॲड. श्री. माणिकराव कोकाटे, मंत्री श्री. नरहरी झिरवाळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


























