लोकमत व वाजपेयी अंतराष्ट्रीय स्कुल तर्फे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेस प्रतिसाद

 

कळंब: (तोफिक मोमीन ) कळंब तालुक्यातील शिराढोण येथील जि प शाळा अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा शिराढोण येते लोकमत न्युज समूहाच्या वतीने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली होती
आदर्श पी एम श्री जि प शाळा येथे लोकमत समूहाच्या वतीने ज्या विद्यार्थ्यांचे सुंदर अक्षर हस्ताक्षर येईल अशासाठी लोकमत समूहाने सुंदर हस्तक्षर स्पर्धा आयोजित केली होती या शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर स्पर्धा ही पूर्ण केली त्यात अनेक विद्यार्थ्यांना बक्षीस हे मिळाली लोकमत समूहाच्या वतीने शाळेचा गुणवत्ता पूर्ण सत्कार ही करण्यात आला व बक्षीस वितरण करण्यात आले तसेच लोकमत समाचार च्या वतीने वृत्तपत्रातील लेखन निबंध सुंदर अक्षर चित्रकला इत्यादी लोकमत प्रसिद्ध करते याचे महत्व विद्यार्थ्यांना दाखवून देण्यात आले व वाचनाचे हे महत्व सांगण्यात आले यावेळी लोकमत वितरणातील कर्मचारी श्री बालाजी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला देण्यात आले यावेळी शिराढोण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब, श्री आदर्श शाळेचे मुख्याध्यापक सुनील अहिरे सर,पंचायत समिती सदस्य राजेश्वर बप्पा पाटील, येथे उपसरपंच अमोल भैया माकोडे, वरून पाटील, एडवोकेट नितीन पाटील, किरण साहाने,राजू भाई डांगे,अशोक महाजन, लोकमतचे रणजीत सर, मंगेश सर, मुख्याध्यापक सुनील अहिरे सर, तसेच शिक्षक रोडे सर, गंगणे सर, होके सर,जाधव सर, तसेच शाळा शालेय समिती अध्यक्ष अमोल सिंह चंदेल, यावेळी उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *