स्वच्छता ठेवणे ही आरोग्याची पहिली पायरी..
मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि महावीर सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील वॉटरग्रेस प्रोडक्ट लिमिटेड चे स्वच्छता कर्मचारी यांना हँडग्लोस आणि मास्क वाटप करण्यात आले.
नाशिक मधील मनु मानसी संस्था आणि महावीर सेवा फाउंडेशन या दोन्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महानगर पालिकाचे ७५ वॉटर ग्रेस चे स्वच्छता कर्मचारी वर्गाला आज दुपारी एक वाजता मास्क आणि हँडग्लोज वाटप करण्यात आले. हा उपक्रम करण्यामागचा दोन्ही संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असे की स्वच्छता दूत हे आपल्या आरोग्याची पर्वा न करता गंगे काठी स्वच्छता ठेवण्याचे कार्य मन लावून करत असतात. पावसाळयात तर अधिक स्वच्छता ठेवावी लागते. त्यांची प्राथमिक गरज लक्षात घेऊन आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन हा उपक्रम दुतोंड्या मारुती, गंगा गोदावरी नदीच्या काठावर करण्यात आला.
यावेळी मनु मानसी संस्थेच्या संस्थापिका मेघा शिंपी यांनी नगर पालिकेचे दराडे सर यांचा सत्कार केला. तसेच महावीर सेवा फाऊंडेशन चे आशिष नहार यांनी नगर पालिकेचे विभागीय आयुक्त हरिश्चंद्र सरांचा सत्कार केला. सुपर वायझर नाईकवाडे सर, अनिलसर, साबळे सर, साळवे सर आणि अनेक नगर पालिकेचे मान्यवर उपस्थित होते.विशेष सहकार्य संजय कानडे सर यांनी केले.महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष अनिल नहार सर, मयूर भंडारी, कुणाल पारख मोहित टाटीया, उपाध्यक्ष दिलीप टाटीया आणि मनु मानसी संस्थेच्या संस्थापिका मेघा शिंपी, कार्याध्यक्ष मीरा आवारे, कविता गायके, लीना गिरमे आणि शोभा सावंत हे उपस्थित होते.
सौ मेघा शिंपी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मनु मानसी संस्था आणि महावीर सेवा फाउंडेशन तर्फे साहित्य वाटप






















