राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वन विभागाला इशारा
सिल्लोड (महादू गुंजाळ) तालुक्यातील गेवराई सेमी पळशी केरळा बाभूळगाव शिवारामध्ये रोहा व हरिण (नील गाय व सांबर) यांनी प्रचंड हैदोस घातला असून शेतकर्यांचे मका कापूस बाजरी सोयाबीन यासारख्या पिकांची प्रचंड नासाडी सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष राहुल कुमार ताठे यांनी स्वतः जायक्यावर जात शेत पिकाची पाहणी केली व शेतकर्यांना रात्रीच्या वेळेस जागाव लागत असल्याने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली तातडीने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे त्यांनी वन विभागाला दिलेला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नासाडी झालेल्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करून एक महिन्याच्या आत भरपाई रक्कम शेतकर्यांना देण्यात यावी, शेतकर्यांना शंभर टक्के अनुदानावर कुंपण तयार करून देण्यात यावे, रोहा व हरिण यासारख्या वन्य प्राण्यांना इतरत्र हलवण्यात यावे, वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी प्रचंड शारीरिक मानसिक त्रासातून जात आहे , शेती पिकांना भाव नाही, अपुरी पर्जन्यवृष्टी त्यात वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी अजूनच मेटाकुटीला आल्याचेही त्यांनी म्हटले आहे, निवेदनावर दादाराव गोडसे, विष्णू बडक, रावसाहेब ताठे, योगेश ताठे, संदीप राजपूत, शंकर मानकर, उत्तम ताठे, रेवन घुगे, पवार,मंगेश ताठे सह शेतकर्यांच्या सह्या आहेत
वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा रास्ता रोको

























