मंठा : ज्ञानेश्वर पवार
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंभोडा कदम येथे आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
आज 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक दत्तात्रय राऊतवाड, यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बाल दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शाळेतील शिक्षक बालाजी नरवाड यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना दिली.काही विद्यार्थ्यांनी पण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर भाषण करून बाकीच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक भीमराव खरात , सहशिक्षक राजेश चव्हाण, विठ्ठल नाईक, बालाजी नरवाड,गणेश कुरे, विठ्ठल नाईक, रुपनर सर, आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते….
*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंभोडा कदम येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी…*


























