पुणे (विनोद माळी)
ऐन दिवाळीत घरफोडी चोरीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील सराईत चोरटा जेरबंद, एकूण ०३ गुन्हे उघडकीस आणून सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ८४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार सायकल, असा एकूण सुमारे १४,३७,६५०/- रू. किं. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ची कारवाई
नारायणगाव पो.स्टे.गु.र.नं. २१९/२०२५ भा.न्या.सं. २०२३ कलम ३०५ (अ), ३३१(३) प्रमाणे दि.१४/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे विष्णू भागूजी सांगडे वय ६२ वर्ष रा. वैभवलक्ष्मी सोसा ए.विंग तिसरा मजला फलॅट नं.२१, विटेमळा नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे हे त्यांचे राहते घराला कुलूप लावून काकडा आरती करीता नारायणगाव येथील मंदीरात गेले असताना दि. १४/१०/२०२५ रोजी पहाटे ०४/०० ते ०६/०० वा दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे राहते घराचे दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजावाटे आत प्रवेश केला आणि बेडरुम मधील लाकडी कपाटातून टातून सोने-चांदीचे दागिने एकूण ११,२०,०००/- किंचे चोरी करून नेले आहेत. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.
दिवाळी सणाचे सुरुवातीस जुन्नर उपविभागात घरफोडी चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी सदरचे मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करणेत आला. घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका काळे रंगाचे मोटार सायकलवरील एक संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, तसेच घटनास्थळावरून संशयित मोटार सायकल हो चाकण बाजूकडे गेली होती.
संशयित मोटार सायकलचा व आरोपींचा स्था.गु.शा. व नारायणगाव पो स्टे कडील तपास पथक एकत्रित शोध घेत असताना पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्हयातील संशयित मोटार सायकल ही सीबीझेड मोटार सायकल असून विशाल दत्तात्रय तांदळे सध्या रा.मंचर ता. आंबेगाव जि.पुणे हा वापरत आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीवर यापुर्वी मालमत्ता चोरीचे एकुण २८ गुन्हे दाखल असुन सदरचा गुन्हा त्याने केला असल्याचे सांगितले.
तपास पथक हे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नारायणगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने, नारायणगाव परिसरात पथकाने सापळा रचून आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे वय २८ वर्षे सध्या रा. मंचर ता. आंबेगाव जि.पुणे मुळ रा. पाटेगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर यास सीबीझेड मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे कडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अधिक विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
अ.क्र.
पोलीस स्टेशन
नारायणगाव पुणे ग्रा.
जुन्नर पुणे ग्रा.
उघडकीस आलेले गुन्हे
गु.र.न. / कलम
२१९/२०२५BNS ३३१(४), ३०५ (अ)
२
३४२/२०२५BNS ३३१(२), ३००५ (अ)
३
१४३/२०२५BNS ३३१(४), ३०५(अ)
आरोपीकडून वरील गुन्हयात चोरीस गेलेले १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ८४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार सवाकल असा एकूण सुमारे १४.३७,९५०/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये आहे.
सदरची कार्मागरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पो स्टे चे सपोनि प्रविण सांग, स्था.गु.शा.चे सपोनि महोदव शेलार, पोलोस अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीन, संदिप वारे, अक्षय नवले, नारायणगाव पो स्टे चे पोसई सोमश्वर शेटे, पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, निलेश जाधव यांनी केली आहे.

























