भुसावळ : ५ जुलै रोजी फेसबुक लाइव्ह द्वारे डोंबिवली येथील माथेफिरू भूषण पाटील भारतरत्न तथा संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांचा जातीवाचक उल्लेख करून अवमान केला. तसेच येवती तालुका बोदवड येथील चर्मकार समाज बांधव अमोल आनंदा बाविस्कर यास उधारीचे पैसे मागितल्यावरून तेथील रहिवासी ज्ञानेश्वर पाटील, मंगला पाटील, कमला पाटील ह्या एकाच कुटुंबातील लोकांनी अमोल यास रात्री शिवीगाळ करून जातीवाचक शब्द वापरून अवमान केला. तसेच जिवंत मारण्याची धमकी दिली. या घटनेबद्दल चर्मकार विकास संघ, जिल्हा जळगाव यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सोमवार ७ जुलै रोजी दुपारी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डी यांना जळगांव चर्मकार विकास संघाच्या पदाधिकारी यांनी दिले.या वेळेस चर्मकार विकास संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथभाऊ सावकारे,जिल्हाध्यक्ष एड. अर्जुन भारुडे,सचिव प्रा.धनराज भारुळे,कार्याध्यक्ष, राजेश वाडेकर ,नाशिक विभाग अध्यक्ष मनोज सोनवणे, ज्येष्ठ मार्गदर्शक काशिनाथ इंगळे, बाळकृष्ण खिरोळे, रतीराम सावकारे, प्रकाश रोजतकर, उमाकांत भारुळे सर, लिलाधर भारुळे ,प्रा.संदीप शेकोकार ,प्रा. रवी नेटके , रिझायनर घुले आदि उपस्थित होते.
चर्मकार समाजातील मान्यवरांचा जातीवाचक उल्लेख करणार्या समाज कंटाकांवर कठोर कारवाईची चर्मकार विकास संघाची मागणी


























