लासलगाव(आसिफ पठाण)
निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील के. जी. एस. शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड (युनिट ऑफ ग्रेनॉच इंडस्ट्रीज लि.) या साखर कारखान्याच्या २०२५-२६ या वर्षातील पहिल्या गाळप हंगामाचा शानदार आणि उत्साहपूर्ण शुभारंभ रविवारी करण्यात आला. लासलगावचे कृषी उद्योजक संजय चांगदेवराव होळकर यांच्या ‘ग्रेनाँच इंडस्ट्रीज’ समूहाने ऑक्टोबर २०२५ मध्ये हा कारखाना एनसीएलटी मार्फत विकत घेऊन सहा वर्षांहून अधिक काळ कारखान्याचे बंद असलेले कामकाज पुन्हा सुरू केले आहे.
या सोहळ्याची सुरुवात रविवारी सकाळी दहा वाजता कारखान्याचे चेअरमन संजय चांगदेवराव होळकर आणि वैशाली संजय होळकर यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून झाली.यावेळी श्री सत्यनारायण पूजा आणि काटा पूजन करण्यात आले.
नाफेड चे माजी सांचलक व अध्यक्ष चांगदेवराव होळकर,चेअरमन संजय होळकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी व संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची पहिली मोळी टाकून औपचारिक गाळप सुरू करण्यात आले.उसाच्या पहिल्या गाडीला झेंडा दाखवून,श्रीफळ फोडून नवीन हंगामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.कारखान्याने यंदा सुमारे ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे,त्या दृष्टीने कारखान्याची यंत्रणा सज्ज आहे.
या वेळी चेअरमन संजय होळकर म्हणाले की,ऊस हे एकमेव हमीभाव देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांच्या कारखान्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.शेतकऱ्यांचे हित जपत,नवीन व्यवस्थापनाने मागील व्यवस्थापनाच्या काळात थकीत असलेल्या ७७६ ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे ६.५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम तीन टप्प्यांमध्ये अदा केली,ज्यामुळे केवळ बुडीत रक्कमच नव्हे,तर इतर देणी देखील पूर्ण झाली. “हा कारखाना सहा वर्षांनी पुन्हा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे.शेतकरी हेच कारखान्याचे आधारस्तंभ आहेत.आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपणार आणि त्यांना योग्य तो भाव देणार. मागील थकीत ६.५ कोटी रुपये अदा करून आम्ही विश्वास निर्माण केला आहे आणि पुढेही तो कायम ठेवू,” असे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले. यावेळी त्यांनी चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या सोहळ्याला नाफेड चे माजी सांचलक व अध्यक्ष चांगदेवराव होळकर,चेअरमन संजय चांगदेवराव होळकर,संचालिका वैशाली होळकर,संचालिका सोनीया होळकर,संचालक सत्यजित होळकर,संचालक प्रकाश दायमा,कार्यकारी संचालक आदित्य होळकर यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य,कारखान्याचे जनरल मॅनेजर सुखदेव शेटे,जनरल मॅनेजर घोरपडे,शेतकी अधिकारी पटेल,देसले,अशोक नाना होळकर ,डॉ.वसंत शिंदे,निरंजन होळकर, शंकर बोडके,परशराम सानप,बाबुराव सानप,विठ्ठलराव पालवे,एकनाथराव फड,अनिल बोचरे,काशिनाथ टर्ले,आकाश बोडके,भानुदास घुगे,ऍड किशीर सांगळे,अरुण बोडके,भाऊसाहेब सानप,दीपक सांगळे,ज्ञानेश्वर घुगे,जयदत्त होळकर,गुणवंत होळकर,जगदीशहोळकर, धंनजय होळकर, मुकुंद होळकर , रोहित होळकर,सोपान काका घोटेकर,तसेच सर्व कार्यकारी संचालक,खाते प्रमुख आणि परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या गाळप हंगामाच्या शुभारंभाने परिसरातील शेतकरी आणि कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


























