*मातंग समाजाने इशारा मोर्चात सहभागी व्हावे!…*

मातंग समाजातील सर्व बंधू -भगिनींना कळविण्यात येते की, आपल्या न्याय हक्क संरक्षण आरक्षणासाठी दि. 10 डिसेंबर 2025 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात हजारोंच्या संख्येने इशारा मोर्चात सहभागी व्हावे.
*बंधू भगिनींनो* , न्याय हक्क घरात बसून मिळत नसते. जे आपल्यासाठी लढतात त्या लढ्यात, आंदोलनात, मोर्चात सहभागी होऊन आपलं अस्तित्व दाखवायचं असते. तेव्हाच दखल होते. दखलपात्र होण्यासाठी, आपल्या पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी यावं. आम्ही निघालो. आपणही नक्की या. आपलाही खारीचा वाटा असू द्या. नाहीतर येणारी पिढी समाज आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणतील आरक्षणासाठी तुम्ही काय केलं. अंतर्मुख होऊन विचार करा, मग तेव्हा आपल्याला कसे वाटेल. विचार करा आणि निघा. आपल्यासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी. नक्कीच आपलं जन्मास आल्याचं सार्थक होईल. आणि हो हे आरक्षण फक्त आपल्याच साठी नाही. आपल्या कुटुंबातील सर्वांसाठी आहे. त्यांनाही समजावून सांगा. त्यांनाही सोबत घ्या. आणि लवकर या. नागपुरात आल्यावर निश्चितच जनसागर पाहिल्यावर समाधान होईल. जे मिळायचे आहे ते मिळेलच. पण मात्र आपण आल्याने ते हमखास लवकर मिळेल. म्हणजे अधिक शक्ती दिसून येईल. काही गोष्टी शक्ती प्रदर्शनाशिवाय होत नाही, मिळत नाही.
*इशारा मोर्चा* म्हणजे आपले शक्ती प्रदर्शन आहे. त्यासाठी आपण सर्वांनी यावे ही विनंती.
🙏
ईश्वरदास गायकवाड
9923941589
संस्थापक अध्यक्ष
अण्णाभाऊ साठे क्रांती परिषद म.रा
बडनेरा जि.अमरावती महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *