मंठा:ज्ञानेश्वर पवार
दि. 08 डिसेंबर 2025 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडदम वाजत आहेत.
प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ते व उमेदवार कंबर कसून तयारीला लागले आहेत.येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडून भाजपा ईतर मित्राने आणि कार्यकर्त्यांने “मेरा बूथ सबसे मजबूत”करावे आणि शत प्रतिशत भाजपाला अप्रतिम विजय करून शिल्पकार बनावे असे आव्हान मा.ता अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा अविनाश नाईक राठोड यांनी केले आहे.
परतूर मंठा विधानसभा मतदार संघातील मंठा तालुक्यात खोराड सावंगी,पाटोदा,हेलस जयपुर,पांगरी गोसावी,तळणी असे 6 जिल्हा परिषद गण असून त्या खाली 12 पंचायत समिती गण आहेत.मतदार संघाचा आमदार बबनराव लोणीकर विधानसभेच्या क्षेत्राचा चौफेर विकास त्यात जोड रस्ते,अंतर्गत रस्ते, ग्रीड योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, खोलीकरण रुंदीकरण करून सिमेंट बंधारे,मंदिरासाठी सार्वजनिक सभागृह, इतर विकास कामे आणि संघटनात्मक कौशल्य,सर्व समाजाला सोबत घेऊन कामे,तयार केलेले चिवट कार्यकर्ते आणि राहुल लोणीकर राजकीय रणनीती, मायक्रो प्लॅनिंग तसेच कार्यकर्त्याची जवळीकता मुळे आगामी जिल्हा परिषद जालना येथे भगवा फडकेल आणि मंठा तालुक्यातील सर्वच्या सर्व जागा ह्या भाजपच्या विजय होतील अशी आशा अविनाश राठोड यांनी व्यक्त केलेली आहे.निवडणुका कधी पण लागू शकतील तरी आपण आत्तापासून कामाला लागावे आणि जास्तीत जास्त लोकांचा संपर्क साधून भाजपचे उमेदवार कसे विजय होतील त्यासाठी काम करावे असे आव्हान राठोड यांनी केले आहे.
शेवटी त्यांनी मंठा तालुक्यातील खो.सांवगी हे जिल्हा परिषद सर्कल मधून नितीन राठोड हे भाजपचे अधिकृत जिल्ह्याचे सर्वात प्रथम लोणीकरांनी उमेदवारीचा सिक्कामार्फत केला आहे.ते जिल्ह्यातील विक्रमी मताने निवडून येतील अशी आशा अविनाश राठोड यांनी शेवटी व्यक्त केली आहे.


























