भोकरदन ( महेंद्र बेराड)
भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालसावंगी येथील पोलीस पाटील पद गेल्या काही कित्येक दिवसापासून रिक्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकात व गावकऱ्यात नाराजीचे सावट दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी राज्य शासनाने पोलीस पाटलांचे आरक्षण सोडून गुणवत्तेनुसार प्रत्येक गावात पोलीस पाटील पद भरून अनेक गावातील पोलीस पाटलांचा प्रश्न सोडविला. त्यामुळे अनेक गावात पोलीस पाटील ग्रामपंचायत मध्ये शासकीय खुर्चीवर नियुक्त झाला आहे.परंतु भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात अद्यापही पोलीस पाटील रिक्त आहे. या रिक्त पदाच्या ग्रहणामुळे गावातील अनेक तंटे वाद – विवाद सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा काय पालट कोण करणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. पोलीस पाटील हे गावातील एक महत्त्वाचे पद आहे, जे ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करतात. या पदाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात आणि त्यांची मुख्य जबाबदारी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे, गुन्ह्यांची माहिती देणे आणि गावात शांतता राखणे ही आहे.
पोलीस पाटील हे गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियमित पोलिसांना मदत करतात. त्यांना गावातील गुन्हेगारी स्थिती, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागते.
पोलीस पाटलांची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांद्वारे केली जाते.
परंतु पोलीस पाटलासाठी महिला आरक्षण जाहीर झाले. परंतु काही एसटी प्रवर्गातील महिला अपात्र झाल्या होत्या. परंतु शासनाने लवकरात लवकर अगोदर जाहीर झालेले आरक्षण जाहीर करून पोलीस पाटलाचा प्रश्न सोडवावा
पोलीस पाटील शासकीय नोकर असल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये व गावात प्रत्येक हस्तक्षेप करावा लागतो. परंतु वालसावंगी हे गाव भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे लोकसंख्येचे गाव असल्याने गावात वालसावंगी सुंदरवाडी एकत्र ग्रामपंचायत असल्याने गावाची लोकसंख्या सतरा हजार लोकसंख्या असून अद्यापही गावात पोलीस पाटलाचे पद रिक्त आहे.
“वालसावंगी हे गाव भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे लोकसंख्येचे गाव असल्याने वालसावंगी साठी एसटी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण राखीव सुटले होते परंतु काही कारणास्तव महिला उत्तीर्ण न झाल्याने पोलीस पाटील पद भरले गेले नाही. परंतु जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांनी लक्ष घालून अगोदर सुटलेल्या एसटी महिला आरक्षण कायम ठेवून त पोलीस पाटील पद भरण्यात यावे. जर हे आरक्षण बदलल्यास एसटी प्रवर्गातील नागरिकांवर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही.”
– यशवंत जाधव सामाजिक कार्यकर्ते वालसावंगी.


























