नाशिक दिनांक २८ नोव्हेंबर : नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे रविवारी दिनांक रविवार दिनांक ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी मिनी आणि युथ या दोन गटाच्या मुले आणि मुलींच्या जिल्हा स्पर्धा आणि निवड चांचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ०९.०० वाजता निवड चाचणीला प्रारंभ होईल. मिनी गटासाठी खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी, २०१२ तर युथ गटासाठी खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी २००५ किंवा त्यानंतरची असावी. खेळाडूंनी यासाठी आधार कार्ड मूळ प्रत, जन्म तारखेचा दाखला, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, १० वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
या निवड चाचणीतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्हा संघासाठी निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे दिनांक ९ ते ११ डिसेंबर, २०२५ दरम्यान आयोजीत २७ व्या महाराष्ट्र राज्य अजिंकयपद आणि निवड चाचणी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवहान नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी किरण घोलप मो. ९५४५५९१९४४, गणेश कलुंगल मो. ९७६७३६८१४३, बंडू जमदाडे मो. ९६८९४७८१४९, अभिषेक सोनवणे मो. ८००७५५८२६२
यांच्याशी संपर्क साधावा.


























