राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली होती मागणी
सिल्लोड: तालुक्यातील गेवराई , बंनकिनोळा बाभूळगाव, वरखेडी भायगाव या पाच गावांची लोकसंख्या लक्षात घेता तथा वारंवार निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या बघून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक राहुल कुमार ताठे व शिष्ट मंडळ यांनी वरील पंचक्रोशीला पूर्ण वेळ वायरमन देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सिल्लोड यांना केली होती, याची दखल घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सिल्लोड तर्फे श्री शैलेंद्र कांबळे यांना पूर्णवेळ वायरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी या पंचक्रोशीसाठी नेहमी प्रभारी किंवा बदलीवर आलेल्या वायरमन ची नियुक्ती केलेली होती,पूर्णवेळ वायरमन मिळाल्याने विजेच्या निर्माण होणाऱ्या समस्येवरती आता तोडगा निघाल्याने पंचक्रोशीतील मंडळी सुखावले आहे.






















