बीड प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ,बीड व विश्वकर्मा नाभिक परिवार बीड यांच्या वतीने श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून समाजातील आपल्या नाभिक व्यवसायाच्या माध्यमातून आपला परिवार आणि आपल्या परिवारातील मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करून एक उंच शिखरावर नेण्याचे काम ज्या पालकांनी केले आहे. ज्यांनी वयाची 58 ते 60 वर्षापर्यंत हा आणि हाच एकमेव व्यवसाय करून आपले जीवन यशस्वी केले आहे अशा पालकांच्या सत्काराचे आयोजन महाराष्ट्र नाभिक महामंडळ,बीड व विश्वकर्मा नाभिक परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी बीडचे तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके साहेब,माजी रोटरी क्लब अध्यक्ष सुनील खंडागळे सर, व्याख्याते रवींद्र राऊत सर,जन शिक्षण संस्थान चे संचालक गंगाधर देशमुख सर,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अनार्थ, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णु वखरे,उपसंपादक नितीन क्षीरसागर इत्यादी मान्यवरांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहणार आहे हा कार्यक्रम 18 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी याज्ञवलक्य वेद सभागृह
शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे,गार्डन समोर,
माने कॉम्प्लेक्स रोड,बीड
सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित होते राहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष विशाल वाघमारे यांच्याकडे करण्यात आले आहे..






















