लासलगाव महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

लासलगाव (आसिफ पठाण )
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला‌. प्रारंभी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन श्री.प्रकाश जगताप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. व एनसीसी छात्रांनी मानवंदना दिली. राष्ट्रगीत व राज्यगीत गायनानंतर प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी आपल्या भाषणात तिरंगा ध्वजाचा योग्य सन्मान राखण्याचे आव्हान करत भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्य सेनानींना आपल्या प्राणांची आहुती देत स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मोठा लढा द्यावा लागला असे मत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, संचालक श्री.संजयबापु होळकर, श्री.हसमुखभाई पटेल, श्री.अनिलशेट डागा, ॲड. संदीप होळकर, डॉ.भाऊसाहेब रायते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे आदि मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट बापू शेळके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *