मौ मोरतळवाडी येथील रहिवाशी श्री किशन चौधरी हे कोतवाल म्हणून कार्यरत होते, 2017 साली त्यांचे निधन झाले, अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलाला म्हणजे पांडुरंग किशन चौधरी यांना त्यांच्या वडिलांच्या ठिकाणी नौकरी मिळावी म्हणून त्यांनी खुप प्रयत्न केले, वडील मरण पावल्यानंतर 2017 नंतर पांडुरंग चौधरी व त्याची आई दोघे त्याच्या वडिलांच्या ठिकाणी कोणतेही मानधन नं घेता कसल्याही अमिषेला बळी नं पडता त्यांनी आपले काम प्रामाणिक पद्धतीने केले कारण त्यांना अपेक्षा आहे की आज माझे पती हयात नाहीत, शासनाच्या GR प्रमाणे एक ना एक दिवस माझ्यामुलाला शासकीय कर्मचारी (कोतवाल ) म्हणून घेतील, परंतु अध्याप असे झाले नाही 9 वर्ष निघून गेले कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलाचा समावेश करून घेण्याचा शासन निर्णय (GR) असतांना देखील 9 वर्ष त्यांना त्यांच्या नौकरी हक्कापासून वंचित ठेवण्यात आले, सदर बाब, किरण सूर्यवंशी मास संघटना तालुका उदगीर यांच्याकडे आली किरण सूर्यवंशी यांनी सर्व बाबी तपासून पहिल्या आणी त्या परिवारासोबत उदगीर तहसीलदार अन्माननी,श्री बोरगावकर साहेबांची भेट घेतली आणी सर्व कागदोपत्री, चर्चा गेली त्यांना GR दाखवला आणी विनंती केली की सदर प्रकरणात आपण जातीने लक्ष देऊन ह्या परिवाराला न्याय मिळून द्यावा आपण तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केल्यावर श्री बोरगावकर साहेबांनी तात्काळ त्यांच्या आस्थापनास आदेश दिले आणी सखोल चौकशी करून अहवाल तयार करा,असे सांगितले, चौधरी परिवार आमच्या संबंधित आहे ते आमचे कर्मचारी होते म्हणून मि विशेष लक्ष देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे म्हणाले
चौधरी परीवाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, मास किरण सूर्यवंशी






















