पुणे (प्रतिनिधी) :
राष्ट्रसंत आचार्य सम्राट प. पू. श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त, जिनशासन प्रभाविका प. पू. चैतन्यश्रीजी म.सा. यांच्या प्रेरणेतून वीतराग सेवा संघ, पुणे व साधना सदन यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ महावीर प्रतिष्ठान येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
समाजोपयोगी कार्याचा गौरव :
४५ वर्षांपासून समाजात आरोग्य सेवा, रक्तदान शिबिर, आर्थिक मदत, योग शिबिरे व गोरक्षण असे उपक्रम राबवणाऱ्या वीतराग सेवा संघाच्या या उपक्रमात २७० हून अधिक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी संघाच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
मुख्य अतिथींच्या प्रेरणादायी उपस्थितीने कार्यक्रम झाला उत्साहीत :
या सोहळ्याचे मुख्य अतिथी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चैनसुखजी संचेती, यशदा संस्थेचे अतिरिक्त महासंचालक विशालजी सोलंकी, उद्योगपती दीपकजी भटेवरा, राजेंद्र मुनोत व फुलचंदजी बांठिया होते. या वेळी विजयकांत कोठारी, अचल जैन, दिलीप कांकरिया आदी मान्यवरांसह जैन समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विचार :
“वीतराग सेवा संघ समाजासाठी मोलाचे कार्य करत असून, कोविड काळातही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते,” असे सांगून त्यांनी पालकांना ‘दहावीच्या निकालानंतर मुलांवर मानसिक दबाव टाकू नका’ असे आवाहन केले.
“फक्त एक टक्का गुण कमी आल्यावर मुलांना तणावात टाकू नका. मुलींनी उच्च शिक्षणात मुलांपेक्षा ०.१% अधिक प्रगती केली आहे, ही त्यांची जिद्द आहे,” असेही त्या म्हणाल्या.
यशसाठी मार्गदर्शन :
विशालजी सोलंकी म्हणाले, “सफलता मिळवण्यासाठी ध्येय निश्चित असावे. सातत्य, एकाग्रता आणि चांगल्या विचारांमुळेच यश शक्य होते.”
दिलीप कांकरिया यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेत सांगितले, “आजचे विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेत.”
कार्यक्रमाचे उत्तम संयोजन :
कार्यक्रमाचे संचालन अनिल गेलडा यांनी केले. आभारप्रदर्शन संजय ओस्तवाल यांनी केले. यावेळी संजय मुथा, सागर संचेती, वर्षा कांकरिया, प्रवीण गुंदेचा, सुनील मुथा, नितीन जैन, अभय नहार, कांतीलाल भंडारी, संतोष बोरा, प्रेमा गेलडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुशील राठोड






















