नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळ व गंगासागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, उदगीरच्या वतीने मा आ.श्री. संजयजी बनसोडे साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त गंगासागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव श्री. नवनाथ गायकवाड व संस्थापक अध्यक्ष प्रा. सौ. पुष्पा नवनाथ गायकवाड यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १९ येथील भगीरथ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय जय संतोषीमाता नगर, येणकी मानकी रोड, उदगीर येथे शिक्षण घेणार्या पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, वाढदिवसाचा औचित्य हे शाल हरे तुरे तथा टाकाऊ बाबींचा वापर न करता समाजोपययोगी उपक्रमांनी राबवण्याच्या संकल्पनेनुसार या स्तुत्य शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या शाळेचे संस्थापक सचिव सौ. मंगलाताई पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर शहराध्यक्ष सय्यद जानीमियॉ, गंगासागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव नवनाथ गायकवाड, या शाळेचे संस्थापक अध्यक्ष गिरीष मंगनाळे, या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य कला संस्कृतिक विभाग लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग लातूर जिल्हाध्यक्ष शफी हाश्मी, जिल्हा सरचिटणीस शेख अमजत, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते संघशक्ती बलांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.
या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नवनाथ गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन जाधव एस. डी. सर यांनी केला तथा आभार चिलमपांडे डी.व्ही सर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळ व गंगासागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, उदगीर तसेच या शाळेतील कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
विकास पुरुष माजी मंत्री आमदार श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्याचे वाटप


























