के. के. वाघ काकासाहेबनगर
(रानवड) येथे रंगणार स्पर्धा; विजेत्यांना रोख पारितोषिके
लासलगाव (): ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील नैपुण्याला वाव मिळावा या हेतूने जिल्हास्तरीय पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. के. के. वाघ शिक्षण संस्था, के. के. वाघ फाउंडेशन, बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन आणि स्माईल व स्पिनच सेंटर ऑफ एक्सलंस यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा रविवार, दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी के. के. वाघ काकासाहेबनगर (रानवड) कॅम्पसच्या भव्य मैदानावर होणार आहे. स्पर्धा सकाळी १०:०० वाजता सुरू होईल, अशी माहिती संयोजन समितीने दिली आहे.
या स्पर्धेत मुलांच्या गटातून एकूण ३२ संघ आणि मुलींच्या गटातून एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. मुला-मुलींच्या विजेत्या संघांसाठी स्वतंत्र व आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक म्हणून १५,१११/-, द्वितीय पारितोषिक म्हणून ११,१११/- आणि तृतीय पारितोषिक म्हणून ९,१११/- रोख रक्कम तसेच चषक प्रदान करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेश नोंदणी तसेच स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी क्रीडा शिक्षक श्री. प्रदीप राठोड यांच्याशी (८६९८९ ०३४६६) या क्रमांकावर संपर्क साधता येईल.


























