*एरंडोलकरांची देवाभाऊंकडे मागणी*

 

*_हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करा !_*

एरंडोल – ‘लव्ह जिहाद’ हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या व्यवसाय, निर्घृण हत्या, मानवतस्करी, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये आतापर्यंत राज्यातील हजारो महिला / युवती बळी पडल्या आहेत.

हिंदू महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करावा, अशी मागणी एरंडोलमधील ३० हून अधिक संघटनांनी एकत्रितपणे केली.
या मागणीसाठीचे निवेदन मनीष कुमार मंगला गायकवाड, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, एरंडोल भाग एरंडोल यांना देण्यात आले.
या वेळी शेकडोच्या संख्येने एरंडोलकर नागरिक उपस्थित होते.

हिंदू जनजागृती समितीकडून १ हजारहून सह्यांचे निवेदन !

हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात एरंडोलमध्ये नागरिकांकडून या कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या अभियानातून २५ हजारहून अधिक सह्या मिळाल्या असून त्या निवेदनासोबत पाठवण्यात आल्या.

सहभागी संघटना :

राष्ट्रीय सेविका समिती, रणरागिणी समिती, सुरभी बहुउद्देशीय महिला मंडळ, थोरवी बहुद्देशीय महिला मंडळ, बहुभाषिक ब्राह्मण महिला मंडळ, संस्कार भारती, खान्देश कन्या व महिला विकास मंडळ, राष्ट्रीय हिंदू संघटन, वारकरी संप्रदाय, हिंदू महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, उत्तर भारतीय ब्राह्मण संघ, हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदू विधीज्ञ परिषद, हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि सनातन संस्था यांसह अनेक फाउंडेशन, मंडळे, व्यापारी असोसिएशन व वकील संघटना यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

1. उत्तर प्रदेश व राजस्थानप्रमाणे आजन्म कारावासाची शिक्षा देणारा कठोर, अजामीनपात्र ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ महाराष्ट्रात लागू करावा व येत्या हिवाळी अधिवेशनात ठोस भूमिका घ्यावी.

2. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या तपासासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करून त्यात स्वतंत्र नोंदी ठेवाव्यात.

3. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांमागील विदेशी अर्थपुरवठा, बँक व्यवहार, युवतींची तस्करी व दहशतवादी कारवायांशी असलेली सांगड याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

4. जबरदस्तीने लव्ह जिहाद किंवा धर्मांतरास मदत करणाऱ्या व्यक्ती, संघटना, मौलवी-मुल्ला, मदरसे-मशीद यांच्यावर कायदेशीर बंदी घालून कठोर कारवाई करावी.

संघटनांनी हा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्याची ठाम मागणी केली. सर्व हिन्दुत्ववादी संघटनानी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *