केजीएस शुगर कारखान्याच्या नव्या व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांची ६.५ कोटींची बुडीत रक्कम अदा

 

लासलगाव(आसिफ पठाण)

निफाड तालुक्यात असलेल्या पिंपळगाव निपाणी येथील ‘केजीएस शुगर ॲन्ड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड’ या साखर कारखान्याच्या नवीन व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या मागील व्यवस्थापनाकडे थकीत असलेली आणि शेतकऱ्यांनी जवळपास बुडीत म्हणून गृहीत धरलेली सुमारे सहा कोटी पाच लाख रुपये इतकी रक्कम नवीन व्यवस्थापनाने संबंधित शेतकऱ्यांना अदा केली आहे.

हा कारखाना सहा वर्षांहून अधिक काळ बंद होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये लासलगावचे कृषी उद्योजक संजय होळकर यांच्या ‘ग्रेनाँच इंडस्ट्रीज’ समूहाने हा कारखाना खरेदी करून त्याचे कामकाज पुन्हा सुरू केले आहे कारखाना सुरू झाल्यानंतर नवीन व्यवस्थापनाने तातडीने मागील व्यवस्थापनाच्या काळात थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या देण्यांची पूर्तता करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

नवीन व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची ही थकीत रक्कम तीन टप्प्यांमध्ये अदा केली.सुरुवातीच्या टप्प्यात २३६ शेतकऱ्यांना, त्यानंतर ७० शेतकऱ्यांना आणि आता तिसऱ्या टप्प्यात ४७० शेतकऱ्यांचे पेमेंट देण्यात आले.एकूण ७७६ शेतकऱ्यांना थकीत रक्कम देण्यात आली आहे.एकूण सुमारे ६ कोटी ५ लाख रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.केवळ बुडीत रक्कमच नव्हे,तर ऊस वाहतूक आणि इतर देणी सुद्धा अदा करण्यात आली.ही एकूण रक्कम ६.५ कोटी रुपयांच्या आसपास आहे.संचालिका सोनिया होळकर यांच्या हस्ते या रकमेचे वाटप करण्यात आले

मागील व्यवस्थापनाच्या काळात अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकीत होते,ज्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते.नवीन व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचे हित जपण्याची भूमिका घेतल्यामुळे आणि सहा वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपण पेटवल्यामुळे स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.स्थानिक पातळीवर ऊस गाळपाची सोय झाल्यामुळे तसेच बुडीत रक्कम परत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा कारखान्याच्या नवीन व्यवस्थापनावरील विश्वास वाढला आहे.

कारखान्याचे चेअरमन संजय होळकर,संचालिका सोनिया होळकर,सत्यजित होळकर,कार्यकारी संचालक आदित्य होळकर,संचालक प्रकाश दायमा,प्रभाकर रायते, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुखदेव शेटे,जनरल मॅनेजर घोरपडे,वसंत शिंदे,शेतकी अधिकारी पटेल,देसले व कारखान्याच्या सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते

फोटो कॅप्शन
केजीएस शुगर कारखान्याच्या नव्या व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांची बुडीत रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना संचालिका सोनीया होळकर तसेच समोर उपस्थित असलेले शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *