चांदवड (महेंद्र गुजराथी)
तालुक्यातील हिवरखेडे शिवारात सामायिक बांधावरून शेतात पाणी गेल्याच्या कारणावरून एकास मारहाण केल्याप्रकरणी चांदवड पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हिवरखेडे येथील शेतकरी संजय रामचंद्र वैराळ (५२) यांनी चांदवड पोलीसात फिर्यादी दिली. त्यात म्हटले आहे की, दिनांक २४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते त्यांच्या शेतातील कांदा पिकास पाणी देत असताना निवृत्ती सखाराम तांबडे व बंडू निवृत्ती तांबडे (रा. हिवरखेडे) यांनी सामायिक बांधावरून शेतात पाणी गेल्याच्या कारणावरून कुरापत काढून वैराळ यांना शिवीगाळ करून हाताच्या चापटीने तसेच लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केली व ‘तू जर येथे परत येथे आला तर तुला मारून टाकू’ अशी दमदाटी केल्याची फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बच्छाव करीत आहेत.
———-


























