लासलगाव (आसिफ पठाण ) लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित जिजामाता कन्या विद्यालयाचा ४१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका नीताताई पाटील यांची निवड करण्यात आली. यानिमित्ताने शाळेचे सुशोभीकरण करून उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले.विद्यार्थिनींनी शाळेबद्दल आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या तसेच विद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा केदार यांनी केले तर लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे प्राचार्य विजय वाणी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या . शिक्षणाबरोबरच बालपणापासून शिस्त व सुसंस्कृतपणा ही मूल्य विद्यार्थिनींमध्ये रुजविली जाऊन विद्यार्थिनींनी व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे हितगुज संस्थेच्या संचालिका नीताताई पाटील यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,शंतनू पाटील,अभय पाटील,पुष्पाताई दरेकर,सिताराम जगताप,लक्ष्मण मापारी,कैलास ठोंबरे,जिजामाता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहन निकम यांनी शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकर तर रेश्मा वैष्णव यांनी आभार मानले. वर्धापन दिनानिमित्त अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
*जिजामाता कन्या विद्यालयाचा ४१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

























