लासलगाव, ( आसिफ pathan ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर च्या वतीने जनजातीय गौरव दिवसाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बिरसा मुंडा जयंती, ज्याला जनजाती गौरव दिवस किंवा आदिवासी अभिमान दिन म्हणूनही ओळखले जाते, भगवान बिरसा मुंडा हे आदिवासींना न्याय मिळावा यासाठी परकीय सत्तेबरोबर लढत होते. दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी प्रेरणादायी आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.
याप्रसंगी प्रा.दीपाली कुलकर्णी, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर व प्रा.देवेंद्र भांडे आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. त्यानंतर इंग्रजी विभागाचे प्रा.महेश होळकर यांनी बिरसा मुंडा यांच्या जिवनजिवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापकांसह रा.से.यो. स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर व प्रा.देवेंद्र भांडे आणि रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
*लासलगाव महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*


























