*लासलगाव महाविद्यालयात पं. नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी*

 

लासलगाव ( आसिफ पठाण ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर च्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर व प्रा. देवेंद्र भांडे यांच्यासह उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक यांच्या हस्ते नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. १४ नोव्हेंबर पंडित नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने प्रा.किशोर गोसावी यांनी सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापकांसह रा.से.यो. स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर व प्रा. देवेंद्र भांडे आणि रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *