*श्री महावीर विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा*

लासलगाव : ( आसिफ पठाण) लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू व श्री महावीर जैन विद्यालय या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. बाबुलालजी ब्रम्हेचा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू व शिक्षणमहर्षी स्व. बाबुलालजी ब्रम्हेचा यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे पालक प्रतिनिधी अक्षय ब्रम्हेचा व पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनचरित्र विषयी माहिती विद्यालयाच्या उपशिक्षिका प्रज्ञा काळे यांनी सांगितली. शिक्षण महर्षी स्व. बाबूलालजी ब्रम्हेचा यांच्या जीवनचरित्र विषयी माहिती विद्यालयाचे उपशिक्षक ज्ञानेश्वर मोहन यांनी सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक भगीरथ सोनवणे व आभार प्रदर्शन उपशिक्षक नितीन कापडणीस यांनी केले.या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राचार्या पल्लवी चव्हाणके, पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ व सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. बाबुलालजी ब्रम्हेचा यांना जयंती निमित्त संस्थेचे कार्याध्यक्ष जवाहरलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, खजिनदार अजय ब्रम्हेचा, संचालक मोहनलाल बरडिया, महावीर चोपडा, अमित जैन, सुनिल आब्बड व संस्थेचे पालक प्रतिनिधी अक्षय ब्रम्हेचा यांनी विनम्र अभिवादन केले. व सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *