कृष्णा गायकवाड(पिंपळगाव बसवंत)
पिंपळगाव बसवंत : आजचा दिवस पिंपळगाव बसवंत शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, कारण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. विकासपुरुष म्हणून ओळख असलेले आदरणीय श्री. भास्करराव (नाना) बनकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नामदार श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
हा निर्णय केवळ राजकीय नाही तर पिंपळगाव बसवंतच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. शहरातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रातील वाढीसाठी हा प्रवेश परिवर्तनाचा शंखनाद ठरेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
आदरणीय नाना बनकर यांनी सदैव जनतेचा विश्वास संपादन करत समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या कार्याला राज्यस्तरीय बळ मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच कार्यकर्त्यांचा सन्मान राखत त्यांना न्याय देण्याचे धोरण ठेवले आहे. त्याच परंपरेत नाना बनकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांना योग्य सन्मान आणि स्थान दिले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.
पिंपळगाव बसवंतच्या विकासाचा हा नवा प्रवास नागरिकांसाठी नवी आशा घेऊन आला आहे. एकजुटीने काम करून, महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेला दिलेली सर्व वचने पूर्ण करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने व्यक्त केला आहे.


























