लासलगाव:(आसिफ पठाण) लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एनसीसी विभागासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. विद्यालयातील दोन एनसीसी कॅडेट्ससह एनसीसी प्रमुखांची राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण शिबिरासाठी निवड झाली आहे.
एनसीसी कॅडेट मयुरेश शेळके व केतन गायकवाड आणि विद्यालयाचे एनसीसी प्रमुख प्रमोद पवार यांची सेवन महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक मधून ‘सरदार पटेल नर्मदा ट्रेकिंग कॅम्प’ गुजरात या शिबिरासाठी निवड झाली आहे.
निवड झालेले हे विद्यार्थी दिनांक १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या आठ दिवसांच्या कालावधीत राजपिपला, गुजरात या ठिकाणी सुरू होणाऱ्या ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प शिबिरात सहभागी होणार आहेत. या शिबिरात सहभागी होऊन ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
या राष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल सेवन महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर एम. एस. केरूला व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तनिष्क गौर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या संचालिका नीताताई पाटील आणि प्राचार्य विजय वाणी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, शंतनू पाटील, अभय पाटील, पुष्पाताई दरेकर, सिताराम जगताप, लक्ष्मण मापारी, कैलास ठोंबरे आणि विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आणि एनसीसी प्रमुख प्रमोद पवार यांचे अभिनंदन केले आहे.


























