श्री संत सेना महाराज श्रमशील दीपस्तंभ पुरस्कार सोहळा संपन्न..
बीड प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ,बीड व विश्वकर्मा नाभिक परिवार बीड यांच्या वतीने श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून समाजातील आपल्या पारंपरिक नाभिक व्यवसायाच्या माध्यमातून आपला परिवार आणि आपल्या परिवारातील मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करून त्यांना डॉक्टर,इंजिनिअर,अधिकारी केले अशा पालकांचा सत्कार श्री संत सेना महाराज श्रमशील दीपस्तंभ पुरस्कार देऊन करण्यात आला. हा कार्यक्रम 18 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी याज्ञवलक्य वेद सभागृह या ठिकाणी पार पडला.
हे पुरस्कार समाजातील कर्तुत्ववान सलून व्यावसायिक व आदर्श पालक म्हणुन श्री. रमेश दगडू पवळ रा. कडा,ता.आष्टी.
श्री अंकुश तुळशीराम आतकरे,ता.गेवराई.
श्री.उत्तमराव फकीरराव दोडके,रा. बीड.श्री मुरलीधर निवृत्ती राऊत ता.माजलगाव. श्री संतोष रावसाहेब काशिद,रा.बीड.श्री अश्रूबा शंकरराव झांबरे,रा.बीड.श्री केशव दामोधर राऊत,रा.बीड.श्री केशवराव बाबासाहेब टाकळकर रा पाली.यांना देण्यात आले…
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुनील खंडागळे सर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले की , प्रशिक्षण हे शिक्षणाचे सोबत चालणारे अंतर्भूत साधन आहे ज्यामुळे कौशल्ये वृध्दींगत होते.आपली शिकलेली मुले नोकरीत जाताना धडपडतात.
ऊद्योग -व्यवसाय थाटताना अडखळतात.व्यवसायामध्येही जीव ओतुन कष्ट केल्यानंतर पुरेसा पैसा मिळवु शकत नाही.याचे एकमेव कारण प्रशिक्षित नसणे होय. आपल्याला संघटीत होऊन BARTI , सारथी सारखी शिक्षण – प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन करुन कार्यान्वीत करणे अत्यावश्यक आहे..
प्रमुख व्याख्याते रवींद्र राऊत सर यांनी व्याख्याने द्वारे सर्वाना नाभिक समाजाचा गौरवशाली इतिहास सांगितला व श्री संत सेना महाराज यांचे अभंग आजही कसे प्रेरणादायी आहेत याचे सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे जण शिक्षण संस्थान चे संचालक गंगाधर देशमुख सर यांनी शिक्षण हे समाजविकासाचे साधन आहे. सर्वच प्रकारचे शिक्षण हे समाजातील प्रत्येक घटक व प्रत्येकक्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे माध्यमातुन पोहोचवणे ही आजची गरज आहे.अशा प्रकारच्या कार्यक्रमातून एक चांगले प्रबोधनाचे काम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष विशाल वाघमारे व नितीन क्षीरसागर हे करत आहेत.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णु वखरे,उपसंपादक नितीन क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले..या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामराव राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन आयोजक विशाल वाघमारे यांनी केले.
या कार्यक्रमात समाजातील ॲड.अरुण जगताप,विक्रम बिडवे,नागेश टाकळकर,सुनील दोडके,अशोक वैद्य,अशोक दोडके,शिवाजी सरडे, सचिन बोबडे प्रमुख उपस्थिती लाभली..
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अक्षय जाधव,सुमीत दोडके,सुरेश झेंडे,संतोष साकला,आकाश सपकाळ,मयूर क्षीरसागर,अक्षय वाघमारे,मंगेश काळे,शुभम प्रधान,सोमेश्वर झगडे,दादा आंबूरे,तुकाराम राऊत,अमोल बिडे,शाम धायरे,चैतन्य खंडागळे,अनिकेत दाइत, आदिनी परिश्रम घेतले…






















