पुणे बनले तपाची पुण्यभूमी, २५ जुलै रोजी पूर्ण होणार २१०० अठाई व्रत

 

हर घर अठाई’ संकल्पातून पुणे समाजाने घडवला तप आणि श्रद्धेचा नवा इतिहास*
पुणे : परिवर्तन चातुर्मास २०२५ च्या निमित्ताने पुणे नगरी जैन तप, संयम आणि साधनेच्या अनुपम ऊर्जेने भारलेली आहे. वर्धमान सांस्कृतिक केंद्र, गंगाधाम परिसरात आयोजित गुरु आनंद अठाई महोत्सव अंतर्गत २१०० श्रद्धाळूंनी घेतलेले अठाई व्रत २५ जुलै रोजी पूर्ण होणार आहेत. ‘हर घर अठाई – मेरे घर अठाई’ या संकल्पातून पुणे ही नगरी तपोभूमी म्हणून प्रतिष्ठित होत आहे.
या ऐतिहासिक तपोत्सवाला पुण्य आणि आध्यात्मिक ऊर्जा लाभत आहे ती परम पूज्य गुरुभगवंतांच्या पावन सान्निध्यामुळे. पुणे समाजाला एका दुर्मिळ दृश्याचा साक्षात्कार होत असून, हे समागम केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण भारतातील जैन समाजासाठी अनुकरणीय ठरत आहे.
या महोत्सवाची प्रस्तावना नुकत्याच पार पडलेल्या पुण्यातील सव्वा कोटी नवकार महामंत्र जपाच्या भव्य अनुष्ठानातून झाली. ही आराधना आता २५ जुलै रोजी अठाई व्रतांच्या परिपूर्णतेच्या शिखरावर पोहोचणार असून, पुणेभरात एकाच वेळी २१०० अठाई व्रते पूर्ण होणार आहेत. हे केवळ धार्मिक अनुष्ठान नाही, तर संयम आणि समर्पणाची तीव्र लाट आहे, जी संपूर्ण पुणे नगरीला आराधनेचे तीर्थक्षेत्र बनवते आहे.
या ऐतिहासिक आयोजनाचे संपूर्ण संचालन श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन ट्रस्ट – पुणे व उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी चातुर्मास समिति २०२५ यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली होत आहे. त्यांच्याच संयोजनातून हा महासंकल्प आपल्या वैभवशाली आणि आध्यात्मिक उन्नतीच्या शिखरावर पोहोचत आहे.
२१०० अठाई व्रतांचा सामूहिक संकल्प हा पुणे समाजाच्या आत्मिक चेतनेचा प्रतीक आहे. हा उपवास नसून, पुण्याहून संपूर्ण देशाला संयम आणि श्रद्धेचा संदेश देणारी चैतन्यलहर आहे.” – अनिल नहार, अध्यक्ष, आदिनाथ संघ
“गुरु आज्ञेचे पालन करत हजारो श्रद्धाळूंनी घेतलेला अठाई व्रतसंकल्प पुण्याला तपाची राजधानी बनवत आहे. हे आयोजन समाजाच्या समर्पण व साधनेची साक्षात घोषणा आहे.” – सुनील नहार, अध्यक्ष, चातुर्मास समिति
गुरु आनंद अठाई महोत्सव केवळ पुण्याचा नव्हे तर संपूर्ण भारतातील जैन समाजाचा अभिमान आहे. प्रत्येक घरातून उठलेली आराधनेची ज्योत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दीपस्तंभ ठरणार आहे.” – राजश्री पारख, अध्यक्ष, स्वागत समिति🌿 मंगलमय सान्निध्य 🌿
प. पू. आचार्य भगवंत विजयलब्धिप्रभ सूरीश्वरजी म.सा.
प. पू. आचार्य श्री विरागसागर सूरीश्वरजी म.सा. (आदि ठाणा-३)
प. पू. जे.पी. गुरुदेव म.सा.
प. पू. आचार्य श्री गुप्तीनंदीजी गुरुदेव म.सा. (आदि ठाणा-३)
उपाध्याय प. पू. श्री प्रवीणऋषिजी म.सा. – आदि ठाणा २
उपप्रवर्तक प. पू. श्री तारकऋषिजी म.सा. – आदि ठाणा ४
युवा तपस्वी प. पू. श्री मुकेशमुनीजी म.सा. – आदि ठाणा ४
तपस्वी प. पू. श्री आगमचंद्रजी स्वामी म.सा. – आदि ठाणा ३
दक्षिणज्योती प. पू. डॉ. श्री आदर्शज्योतीजी म.सा. – आदि ठाणा ३
जिनशासन गौरव प. पू. श्री सुनंदाजी म.सा. – आदि ठाणा ६
जिनशासन प्रभाविका प. पू. श्री चैतन्यश्रीजी म.सा. – आदि ठाणा ४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *