नाशिक / पालखेड(एएचबी) नाशिक: निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरातील जवळचा
नातेवाईक असल्याची बतावणी करत निफाड चे आमदार दिलीप बनकर यांच्या जवळचा असल्याचे सांगून गोदाकाठ परिसरात अभिषेक (कल्पेश ) प्रभाकर पाटील (वय २४) या जामनेर तालुक्यातील एकुळती गावातील भामट्याने बॅनरबाजी करत नागरिकांना विविध ठिकाणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून गंडा
घालण्याचे सत्र सुरू केले होते. याविरोधात एक तरुणी पुढे येत या ठकसेनाला आळा घालण्यासाठी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला. सायखेडा पोलिसांनी या ठकसेन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील परंतू हल्ली मु. द्वारका (नाशिक) येथे असलेल्या आरोपी
गोदाकाठ परिसरात नागरिकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या भामट्याचा पर्दाफाश
अभिषेक पाटील हा मार्च २०२२ पासून आजतागायत गोदाकाठ परिसरात मा. मंत्री गिरीश महाजन यांचा तोतया पुतण्या तर गुलाबराव पाटील यांचा नातेवाईक असल्याची माहिती सांगत होता. या माध्यमातून पोलीस प्रशासनात नोकरीला लावून देण्याचे नागरिकांना आमिष दाखवून देत होता. याबाबत काही नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून त्याने गंडाही घातला होता. परंतू त्याचे बिंग स्वाती राजेंद्र चाबुकस्वार (वय १९), रा. बेघरबस्ती, औरंगपूर (ता. निफाड) या तरुणीला पोलीस खात्यात नोकरीस लावून देतो, असे आश्वासन देवून स्वातीच्या आई वडिलांचा विश्वास संपादन करून तिला पोलीस करुन देतो, त्याबाबत ८ लाख रुपयांची मागणी त्याने चाबुकस्वार कुटुंबाकडे केली होती. मंत्र्यांचा नातेवाईक असल्याने गोदाकाठ परिसरात महागडी चारचाकी वाहने
घेऊन येत असल्याने आरोपी पाटील याच्यावर विश्वास ठेवून स्वातीच्या आई-वडिलांनी
साडेचार लाख रूपये पोलीस होण्याच्या लालसेने दिले. स्वातीला पोलिसांचा खोटा गणवेश, खोटी नंबरप्लेट तयार करून विविध मान्यवरांकडून स्वातीचा पोलीस म्हणून सत्कार करून चांदोरी गावात व गोदाकाठ परिसरात राजेंद्र चाबुकस्वार यांची मुलगी पोलीस झाल्याची नागरिकांना बतावणी करत बनावट पोलीस कागदपत्रे तयार करून मुंबई येथील दादर परिसरातील महावीर पोलीस अकॅडमीत पोलीस ट्रेनिंग करता स्वातीला दाखल केले व परिसरात खोटे बॅनरबाजी करून चाबुकस्वार परिवाराचा विश्वास संपादन करून पैशांची फसवणूक केल्याची घटना चांदोरी परिसरात घडल्याने मंत्र्यांचा नातेवाईक हा बनाव करणाऱ्या अभिषेक पाटीलचा बुरखा सायखेडा पोलिसांनी फाडून त्यास
अटक केली. या गंभीर प्रश्नाकर मंत्र्यांची बदनामी होत असल्याने निफाड व नाशिक भाजप पक्षातील पधिकारी आक्रमक झाले होते.
नाशिक ग्रामीण भाजप चे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या नेतृत्वाखाली जगन कुटे, आदेश सानप, सारिका डले या भाजप पदाधिकायांनी ना. गिरिश महाजन यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या
या तोतया पुतण्याविरुद्ध तसेच निफाड तालुक्याचे आमदार दिलीप
बनकर यांच्या
लेटरहेडचाही वापर करणाऱ्या अभिषेक पाटील वर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सायखेडा पोलीस ठाणे उपनिरीक्षक विकास ढोकरे यांना दिले आहे. या ठकसेन आरोपीला राजकीय वरदहस्त होता का, हे पोलीस तपासात उघड झाले पाहिजे. कारण एवढे मोठे धाडस राजकीय पाठबळ असल्याशिवाय कुणी करू शकते
गिरीश महाजन गुलाबराव पाटील दिलीप बनकर च्या नावाचा गैर वापर करणार्या तोतया आरोपी अटकेत






















