श्री महेंद्र बेराड सर भोकरदन तालुका प्रतिनिधी (दि. २ पारध ) येथील ग्रामदैवत पराशर ऋषी यांच्या पावन पवित्र स्थळी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पारध नगरीचे भूमिपुत्र ह.भ. प. प्रा. अक्षय लोखंडे पाटील पारधकर यांनी आपली पहिलीच किर्तन सेवा दिली. यावेळी त्यांनी शिवचरित्र सादर करत पोवाडा यासह विविध सामाजिक विषयावर प्रकाश टाकत सीमेवर लढणाऱ्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले. यासाठी त्यांनी संत तुकारामाचा “धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन” या अभंगाची निवड करून प्रत्येक भारतीयांनी आपला भारतीय धर्म पाळावा याबद्दल प्रबोधन केले. या त्यांच्या पहिल्याच किर्तन सेवेबद्दलआध्यात्मिक , सामाजीक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे. प्रा.अक्षय पाटील लोखंडे हे शिक्षण क्षेत्रातले असून त्यांना सर्व विषयाची जाणीव असून ते सध्या संत साहित्याचे अध्ययन करत आहेत. त्यांना सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर, ह.भ. प. अंबादास महाराज पारध व ह. भ. प. संतोष महाराज पवार यांचे विशेष मार्गदर्शन व गुरु आशीर्वाद लाभला आहे.
ह.भ.प.प्रा.अक्षय लोखंडे पाटील यांची पहिलीच किर्तनसेवा आपल्या जन्मभूमी पारध नगरीत उत्साहात पार पडली






















