७२ तासांचे ‘अर्हम पुरुषाकार मेडिटेशन’ शिबिर यशस्वीरित्या संपन्न— प. पू. प्रवीण ऋषिजी म.सा. यांच्या प्रेरणेतून आत्मजागृतीच्या दिशेने अनोखी वाटचाल

 

पुणे, ४ ऑगस्ट २०२५ – प्रेरणापुरुष, उपाध्याय प्रवर, अर्हम विज्जा प्रणेते प. पू. प्रवीण ऋषिजी म.सा. यांच्या प्रेरणेतून ‘अर्हम पुरुषाकार मेडिटेशन’ हे ७२ तासांचे विशेष ध्यानशिबिर पुण्यात यशस्वीरित्या पार पडले. हे शिबिर २ ऑगस्टपासून ४ ऑगस्टपर्यंत वर्धमान सांस्कृतिक केंद्र, गंगाधाम येथे आयोजित करण्यात आले होते.

या आत्मिक साधनेच्या शिबिरात एकूण ५१ साधक सहभागी झाले. त्यांनी सलग मौन, ध्यान व आत्मनिरीक्षणाच्या माध्यमातून अंतर्मुख होण्याचा अनुभव घेतला.
हे संपूर्ण शिबिर मौनाधिष्ठित होते — शिबिरस्थळी प्रवेश करताच सर्व साधकांचे मोबाइल जमा करण्यात आले, जेणेकरून बाह्यसंपर्कापासून पूर्णतः विलग राहून अंतर्मुख ध्यानात ते मनोभावे सहभागी होऊ शकतील.

या दिव्य प्रयत्नाचा उद्देश केवळ ध्यान नव्हे, तर आत्मजागृती, विचारशुद्धी आणि जीवनदृष्टी स्पष्ट करणे हाच होता.
या शिबिराचे आयोजन अर्हम पुरुषाकार मेडिटेशन टीम, पुणे यांनी केले होते, जे अनेक वर्षांपासून जनमानसात ध्यान व धर्माचे मर्म पोहोचवण्यासाठी समर्पित आहेत. येत्या काळात आणखी अशा शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प अर्हम पुरुषाकार टीम पुणेने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *