६९ वैज्ञानिक प्रतिकृती व २३ विज्ञान रांगोळ्यांची मांडणी; मंगरूळ विद्यालयात विज्ञान प्रदर्शन व विज्ञान रांगोळी प्रदर्शन

 

चांदवड (कीर्ती गुजराथी) –
विकास मंडळ मंगरूळ संचलित मंगरुळ येथील आदर्श नूतन माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षे २०२५-२६ साठी शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान रांगोळी प्रदर्शन पार पडले.
विज्ञान प्रदर्शनाचे उदघाट्न संस्थेचे संचालक अजय जाधव यांच्याहस्ते तर रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष धोंडीराम चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. कैलास देशमुख यांनी दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक परशुराम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक बाळकृष्ण जाधव यांनी केले. यावेळी ६९ वैज्ञानिक प्रतिकृती आणि २३ विज्ञान रांगोळ्या प्रदर्शनासाठी शालेय प्रांगणात व सांस्कृतिक सभागृहात मांडण्यात आल्या होत्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती, विविध समित्यांचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांनी बाल वैज्ञानिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांचा आनंद द्विगुणित केला. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोरे यांनी विज्ञान प्रतिकृती व रांगोळी प्रदर्शनाचे परीक्षण केले. रांगोळी प्रदर्शनाचे नियोजन शिल्पा आहिरे यांनी केले. मोतीराम शिंदे यांनी आभार मानले. विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी शिक्षक, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
——
फोटो- मंगरुळ येथील आदर्श नूतन माध्यमिक विद्यालयात आयोजीत विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी मांडलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतींचे परीक्षण करताना मुख्याध्यापक मोरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *