तालुका विधी सेवा समिती एरंडोल येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

( तुषार शिंपी. एरंडोल)

एरंडोल येथील तालुका विधी सेवा समिती, एरंडोल येथे दि.13/12/2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयाेजन करण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण 20 दाखलपुर्व प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.5,78,323/- ची तडजोड झाली. तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकुण 137 प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.21,45,893/- ची तडजोड झाली. एकंदरीत एकुण 157 प्रकरणे निकाली झालेली असून त्यात रक्कम 27,24,216/- रु.ची तडजोड झाली.

सदर लोकअदालतीच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती बी. ए. तळेकर , अध्यक्ष तालुका विधि सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एरंडोल ह्या पॅनल प्रमुख म्हणून तर पंच न्यायाधीश म्हणून विधिज्ञ श्री. आकाश एन. महाजन उपस्थित होते. तसेच अॅड. श्री. एम. एम. महाजन अध्यक्ष तालुका वकील संघ एरंडोल, सहसचिव अँड. प्रेमराज पाटील व इतर विधिज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी इ. उपस्थित होते.

यावेळी श्रीमती बी. ए. तळेकर , अध्यक्ष तालुका विधि सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एरंडोल, पंच न्यायाधीश विधिज्ञ श्री. आकाश एन. महाजन व ॲड. डी. बी. महाजन यांनी उपस्थित पक्षकारांना लोक अदालत बाबत मार्गदर्शन केले.
………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *