राजेंद्र टोपले , सुरगाणा
जगभरात १० डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त राज्यशास्त्रविभाग विशाखा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख व्याख्याते प्रा. सुभाष पवार यांनी मानवी हक्कांच्या संदर्भात राजकीय विचारवंतांचे हक्काबाबतचे विचार स्पष्ट केले. मानवी हक्कांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाचे योगदान सांगून भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची माहिती दिली. तसेच भारतातील हक्कांची वास्तव परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेऊन स्रियांचे हक्क, बालकांचे हक्क व वंचितांचे हक्क याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर यांनी आज मानवी हक्क व अधिकार अबाधित ठेवण्याची गरज आहे. आपले हक्क व अधिकार बजावत असताना इतरांच्या हक्काची पायमल्ली होणार नाही याची प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. सुरेश भोये यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कविता भोये यांनी केले तर आभार डॉ. चंद्रकांत पाटील यांनी मानले सदर कार्यक्रमास डॉ. रविंद्र हिरे, डॉ. संतोष पवार प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























