नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील उपस्थित.
कृष्णा गायकवाड ( पिंपळगाव बसवंत)
दि. 17 निफाड नगरपंचायत व निफाड पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ड्रग्स विरोधी जनजागृती मॅरेथॉन रॅली संपन्न झाली.. रॅलीस प्रमुख उपस्थिती निफाड विधानसभे चे आमदार मा .श्री .दिलीप काका बनकर ,जिल्हा अधिकारी नाशिक मा श्री. जलजजी शर्मा साहेब, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, प्रभारी नगराध्यक्ष निफाड नगरपंचायत मा . श्री अनिल पाटील कुंदे निफाड.
निफाड पोलीस स्टेशन पोलीस उपाधीक्षक माननीय श्री कांती लालजी पाटील ,पोलीस स्टेशन निफाड पोलीस निरीक्षक मा. श्री गणेश जी गुरव ,मुख्याधिकारी निफाड नगरपंचायत मा. श्री धीरज जी भामरे व सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका निफाड नगरपंचायत यांच्या समवेत उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमात नगरसेवक नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले .
ड्रगचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबत अधिक माहिती देण्यात आली तसेच गुन्हेगारीला मिळणारे खतपाणी व समाजातील तेढ या सर्वांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी सुरू केलेला हा उपक्रम अधिक महत्त्वाचा ठरत आहेत.
15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे औचित्य सादर विद्यार्थ्यांना व नागरिकांना ड्रग्स मुक्त समाजासाठी शपथ देऊन या अभियानाचा भाग करून घेतला निफाड पोलीस स्टेशनचे श्री गणेश गुरव यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करत समाजाला योग्य संदेश दिला आहे.






















