लासलगाव(आसिफ पठाण)
निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस शुगर कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ रविवार कारखान्याचे चेअरमन संजय चांगदेवराव होळकर व वैशाली संजय होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला लासलगावचे उद्योजक संजय होळकर यांनी एलसीएलटीमार्फत हा कारखाना विकत घेतला असून त्यांच्या नव्या व्यवस्थापनाने या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत एकंदरीत भविष्याचा विचार करता मागील काळातील मागील व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांची बुडीत रक्कम नवीन व्यवस्थापनाने मात्र तीन टप्प्यांमध्ये ती संबंधित शेतकऱ्यांना अदा केली आहे.पहिल्या टप्प्यात 236 शेतकऱ्यांना १ कोटी ६७ लाख रुपयांचे वाटप केले गेले दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना २६ लाख रुपयांचे वाटप केले गेले आणि आज सुमारे ७१२ शेतकऱ्यांना तीन कोटी रुपयांचे वाटप केले गेले असे एकूण शेतकऱ्यांनी बुडीत गृहीत धरलेले पैसे सुमारे पाच कोटी पाच लाख रुपये नवीन व्यवस्थापनाने संबंधित शेतकऱ्यांना या ठिकाणी अदा केले आहे त्याचप्रमाणे पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायतीची 33 लाख 18 हजार रुपयांची घरपट्टी थकीत होती तीही त्या ग्रामपंचायतीला अदा करण्यात आलेली आहे तलाठी कार्यालयाचे सुमारे सहा लाख रुपये आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे सुमारे सात लाख रुपये हे सर्व पेमेंट आजतागायत संबंधितांना अदा करण्यात आलेले आहे यामुळे कारखाना कार्यक्षेत्रामध्ये संबंधित घटकांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा नवीन कारखाना उद्योग समूहावर खूप विश्वास वाढला आहे चेअरमन संजय होळकर यांनी येत्या पंधरा दिवसात कारखाना सुरू होणार असल्याचे सांगत ऊस दराबाबत या कार्यक्रमात महत्त्वाची घोषणा केली.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून टप्प्याटप्प्याने प्रति टन ऊसाला देण्यात येणाऱ्या दराची प्रामुख्याने या ठिकाणी घोषणा केली त्यामध्ये 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये कारखान्यास जे ऊस उत्पादक शेतकरी ऊस पुरवतील त्यांना प्रति टन 3100 प्रति टन भाव जाहीर करण्यात आला दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी साठी प्रति टन 3200 चा भाव जाहीर करण्यात आला आहे आणि 15 जानेवारी नंतर कारखान्यात जे जे शेतकरी उसाचा पुरवठा करतील त्यांना प्रति टन 3300 रुपये प्रति टन असा भाव मिळेल.या घोषणेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांनी आणलेला ऊस अत्यंत पारदर्शी पद्धतीने काट्यावर त्याचे वजन झाल्यानंतर अवघ्या दोन तासात संबंधित शेतकऱ्याला त्याच्या उसाचे एक रकमी रोख पेमेंट कारखाना गेटवर अदा केले जाईल कारखान्याच्या संचालिका सोनिया होळकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की कारखान्याने यंदा कमीत कमी दोन लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यामुळे चालू हंगामात ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस या कारखान्याला पुरवावा व उसाच्या भावाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,शेतकरी नेते प्रभाकर रायते रामदास शिंदे,युवा नेते शंतनु पाटील,कृषी भूषण पद्माकर मोराळे,विलास गायधनी,बाजार समिती संचालक राजेंद्र बोरगुडे,भीमराव काळे,कैलास सोनवणे,गणेश डोमाळे, समीर समदडिया,शेतकरी संघटनेचे बाबासाहेब गुजर, स्वाभिमानीचे निवृत्ती गारे,रामनाथ बोरगुडे,नाना वाळुंज,विठ्ठलराव पालवे,अशोक नागरे,आनंद घोटेकर,उत्तम घोटेकर अशा असंख्य शेतकऱ्यांसह कारखान्याचे चेअरमन संजय होळकर,संचालिका सोनिया होळकर,सत्यजित होळकर,कार्यकारी संचालक आदित्य होळकर,संचालक प्रकाश दायमा,कारखान्याचे जनरल मॅनेजर सुखदेव शेटे,जनरल मॅनेजर घोरपडे,वसंत शिंदे, शेतकी अधिकारी पटेल,देसले व कारखान्याच्या सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी तसेच लासलगाव प्रेस क्लब चे सदस्य उपस्थित होते फोटो कॅप्शन पिंपळगाव निपाणी येथे केजीएस शुगर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपण समारंभात बोलताना कारखान्याचे चेअरमन संजय होळकर समवेत व्यासपीठावर उपस्थित मान्यवर
*पिंपळगाव निपाणी येथे केजीएस शुगर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ उत्साहात संपन्न*


























