प्रतिनिधी – कृष्णा गायकवाड (पिंपळगाव बसवंत)
आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तसेच संस्थापक अध्यक्ष अर्जुन भाऊ गांगुर्डे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान कोळीवाडा, ओझर मिग येथे ‘आदिवासी क्रांती सप्ताह’ भव्यपणे आयोजित करण्यात आला.
या सप्ताहात विविध सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आकर्षक मिरवणूक, पारंपरिक कला-सादरीकरणे, विविध स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रांना स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी शक्ती सेनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय वस्तूंचे वाटप, लोकजागृती कार्यक्रम यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. उपस्थित नागरिक, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अर्जुन भाऊ गांगुर्डे यांच्यासह निलेश मोरे, नरेश गायकवाड, दत्तू जाधव, गोरख पावटे, ज्येष्ठ चंद्रभान गायकवाड, खंडू भवर, निवृत्ती आचारी, विकी साळुंखे, राकेश जाधव, आकाश गांगुर्डे, सुभाष जाधव, नाना डांबळे, सुरेश ब्राम्हणे, राहुल जाधव, अशोक जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.
ओझर शहरातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्ज प्राप्त झाली.
आदिवासी संस्कृती, परंपरा आणि क्रांतीवीरांच्या शौर्यकथेचा गौरव अधोरेखित करत ‘आदिवासी क्रांती सप्ताह’ उत्सव यशस्वीपणे संपन्न झाला.


























