चांदवड (कीर्ती गुजराथी) –
विषारी औषध सेवन केल्याने तालुक्यातील रेडगाव खुर्द येथील ६३ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रेडगाव खुर्द येथील पंढरीनाथ मुरलीधर काळे (६३) हे शेतात उलट्या करताना दिसून आल्याने त्यांना नातलगांनी तातडीने काजीसांगवी येथील रुग्णालयात व तेथून रुग्णवाहिकेने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात व तेथून हिरे मेडीकल कॉलेज धुळे येथे दाखल केले असता तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची कागदपत्रे चांदवड पोलीसांना प्राप्त झाल्याने पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. बी. बच्छाव करीत आहेत.


























