लासलगाव (आसिफ पठाण)
शहरात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पालखी सोहळ्यात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अभिषेक, महाआरती, प्रसाद वाटप यावेळी करण्यात आले.
शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी सात वाजता नवनिर्वाचित समाज अध्यक्ष पंकज सुर्वे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी व श्री संत सेना महाराज यांचे पूजन संपन्न झाले. ९ ते ११ या वेळेत पालखी सोहळा संपन्न झाला. ११ ते १२ या वेळेत श्री संत सेना महाराज यांच्या जीवनावर आधारित हभप कैलास महाराज काळे यांचा प्रवचनाचा कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध मान्यवरांनी यावेळी कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, समस्त नाभिक समाजाचे नवनिर्वाचित पदाधिकारी, महिला सखी मंच सदस्या यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लासलगावी संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रम


























