करुणामूर्ती, तपश्चर्येची तेजस्विनी, उपप्रवर्तिनी पू. किरणसुधाजी म.सा. व विशालप्रभाजी म.सा. आदि ठाणा ०७ यांच्या सान्निध्यात, आजपासून जैन चातुर्मासाचा मंगल प्रारंभ भव्य श्रद्धाभावात झाला आहे.
ही संतपरंपरा, कर्नाटक गजकेशरी, घोर तपस्वी पू. गणेशलालजी म.सा. यांच्या परंपरेतील आहे, तर पू. किरणसुधाजी म.सा. या महाराष्ट्र प्रवर्तनी पू. प्रभाकंवरजी म.सा. यांच्या सुशिष्या असून, चातुर्मासाच्या निमित्ताने आत्मसाधना, प्रार्थना, प्रवचन व तपश्चर्या यांचा चार महिन्यांचा महोत्सव सुरु झाला आहे.
गुरुपौर्णिमा विशेष
जैन धर्मात गुरुंना अनन्यसाधारण स्थान आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा स्रोत, धर्ममार्गाचे दीपस्तंभ आणि आत्मशुद्धीचा प्रेरणास्रोत. गुरुपौर्णिमेच्या पावन दिनी गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची अर्पणवाणी वाहण्यात आली.
प्रवचनाचा विशेष कार्यक्रम:
सकाळी ०९.०० ते १०.०० वाजेपर्यंत – आत्मजागृतीचे दीप प्रज्वलित करणारे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले.
प्रतिक्रमण: संध्याकाळी ०६.४५ वाजता, आर. के. स्थानक, भायखळा येथे श्रावक-श्राविकांसाठी प्रतिक्रमणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या चातुर्मास पर्वात मकल्याणाची वाटचाल करणारे हे कार्यक्रम सर्व जैन बांधवांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.
जैन धर्मात गुरु शिवाय काहीच नही : किरणसुधाजी


























